Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चाकण येथे ३६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

पिंपरी |महाईन्यूज|

चाकण जवळील मेदनकरवाडी ( ता. खेड, जि. पुणे ) येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २६ जुलै ) रात्री नऊ ते साडेनऊचे सुमारास घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. राजेंद्र जालिंदर काळे ( वय ३६, रा, सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि.पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काळे हा सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी येथील आपल्या घराजवळ उभा असताना आलेल्या हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळे याला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. हा हल्ला नेमका कुणी व का केला याची माहिती पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होती. खून झालेला युवक हा रिक्षा चालक होता. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठीकठिकाणी नाका बंदी केली असून वेगाने तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button