TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा स्थगित

शिवसृष्टीचे लोकार्पण लांबणीवर 

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (२० नोव्हेंबर) करण्यात येणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव अमित शहा यांचा पुणे दौरा स्थगित करण्यात आला असून, त्यामुळे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. 

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका आदी प्रसंग थ्री-डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम म्हणाले, की काही अपरिहार्य कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रविवारी नियोजित असलेला पुणे दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा आता पुढील महिन्यात प्रस्तावित आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button