काका पवारांच्या तालमीतच आली ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-3.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
कोणताही खेळाडू जिंकला असला तरी ही मानाची महाराष्ट्र केसरीची गदा काका पवार यांच्याच तालमीत येणार, हे निश्चित झाले होते. कुस्ती शौकिनांसाठी काकासाहेब पवार हे नाव नवे नाही. त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय तब्बल 31 पदके मिळवून देऊन केंद्र शासनाचा “अर्जुन” पुरस्कार मिळवला. यंदाच्या अंतिम फेरीतील हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके हे दोन्ही खेळाडू काका पवार यांच्याच तालमीतील होते.
निवृत्तीनंतर काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय पदकविजेता पैलवान राहुल आवारे, पैलवान उत्कर्ष काळे, पैलवान विक्रम कुराडे, यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व ऑलिम्पिकच्या स्पर्धेतील पैलवान घडवले. तसेच अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पैलवान घडवले. “महाराष्ट्र केसरी”ची आजपर्यंत काकासाहेबांच्या क्रीडा संकुलात नव्हती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरीची गदा काकासाहेबांचा पैलवान वाजत-गाजत आपल्या तालमीत घेऊन आले आहेत.