breaking-newsTOP Newsपुणे

कांदा निर्यात बंदी विरोधात आंबेगाव तहसील कार्यालयावर शिवसेनेचा ‘हल्लाबोल’

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाविरोधात आज (दि. १६) आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

“केंद्र सरकारने अचानक लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनातील हलाखीच्या परिस्थितीत आधीच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन ही निर्यात बंदी तात्काळ उठवावी यासाठी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. केंद्राने ही निर्यातबंदी मागे न घेतल्यास बळीराजाच्या हितासाठी यापुढील काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेनेच्या वतीने उभे करण्यात येईल, असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अलका घोडेकर, युवासेना विस्तारक सचिन बांगर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात, कल्पेश बाणखेले, युवासेना तालुकाधिकारी धनेश मोरडे, महिला आघाडी उपाध्यक्ष मालती थोरात, हेमलता मोरे, तुकाराम काळे, विजय घोडेकर, अजित चव्हाण, संतोष डोके, अशोक थोरात, विश्वास लोहोट, विजय अढारी, मिलिंद काळे, रवी वळसे, प्रशांत काळे, स्वप्नील हिंगे, श्रीकांत लोखंडे, स्वप्नील सैद आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button