Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/ajit_pawar-pune.jpeg)
पुणे | महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.