अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/rape-bikaner_201809134322.jpg)
पुणे- अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.
राहुल विलास कांबळे (वय 20, रा. फुरसुंगी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय पीडितेच्या आईने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. पीडितेला 29 जुलै रोजी फुस लावून पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कांबळे याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. पीडितेचा अद्याप 164 नुसार जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे, यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने कांबळे याचा जामीन फेटाळला