Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मी मंत्री पदाची मागणी केली नाही’; लक्ष्मण हाकेंनी दिलं स्पष्टीकरण

Laxman Hake | विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. अशात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंनी थेट शिक्षणमंत्री किंवा महसूल मंत्री बनण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, त्यामुळे विधान परिषदेवर माझी बोळवण करू नका, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

लक्ष्मण हाकेंना विधान परिषदेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विधान परिषद काय? अर्ध्या लोकसंख्येचा आवाज असलेल्या माणसाला विधान परिषद काय देताय? कॅबिनेट पद दिलं पाहिजे. शिक्षणमंत्री, महसूलमंत्री पद दिलं पाहिजे. विधान परिषदेवर बोळवण करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा आवाज आहे हा. मी कोणाकडे भीक मागणार नाही. मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, विधान परिषद काय घेऊन बसलात? महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलंय. मी जर तर ची भाषा बोलत नाही. मी त्यावेळी पत्रकार परिषद घेईन. मला एकनाथ शिंदेंनी चांगली ऑफर दिली तर जाईन, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

हेही वाचा     –      विद्यमान विधानसभेचा शेवटचा दिवस, अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही!

कॅबिनेट पद आणि विधान परिषदेबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली. त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया खात्यावरून या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, मी मंत्री पदाची मागणी केली नाही तसा माझा उद्देश नव्हता, मला विधानपरिषदेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा उपहासत्मक बोललो, माझ्यासाठी ओबीसीचे प्रश्न महत्वाचे आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button