अत्याचारप्रकरणी मौलानावर कारवाई करा; आमदार डॉ. गो-हे यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/gorhe_neelam.jpg)
पिंपरी – भारती विद्यापीठ पोलीस ठाणे क्षेत्रातील मदरशात मौलाना रहीम यांनी मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे शुक्रवारी (दि. २७) उघडकीस झाले आहे. याबाबत मौलाना आणि त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आमदार डॉ. निलम गो-हे यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना केली आहे.
यासंदर्भात डॉ. गो-हे यांनी पत्र देऊन सूचना दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, पुणे-कात्रज येथील एका मदरशामध्ये मौलाना रहीम यांनी मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यात १० वर्षीय दोन पीडित मुले अत्याचाराला वैतागून पुणे स्टेशन येथे पळून आली असल्याचे एका सामाजिक संस्थेच्या निदर्शनास आले. हे दोन मुले पुणे स्टेशन परिसरात छोटी-मोठी कामे करुन जगण्यासाठी संघर्ष करत होती. पीडित दोन्ही मुले कात्रजच्या आरके कॉलनीतील मदरशात वास्तव्यास होते. परंतु, मौलाना याच्या अत्याचाराला कंटाळून पंधरा दिवसांपूर्वी तेथून पळून आल्याची माहिती आहे, असे आमदार डॉ. गो-हे यांनी सूचना पत्रात म्हटले आहे.
पोलीस आयुक्त शुक्ला यांना केलेल्या सूचना
- स्त्री आधार केंद्राचे प्रतिनिधी आज शिवाजीनगर येथील बाल न्यायालयात मदारशातील पीडित मुलांना विचारपूस करण्याकरिता गेली असता ते मुले सतत झोपत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलांना काही अमली पदार्थ दिले किंवा कुपोषणांमुळे ही मुले सतत झोपत आहेत, हे मुलांची भेट घेऊन त्वरित विचारपूस करण्यात यावी. तात्काळ त्यांचे मेडिकल करून समुपदेशन करण्यात यावे.
- मौलाना यांनी आणखी असे किती मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत, हे तपासण्यासाठी कार्यवाही करावी.
- अत्याचार पीडित २ मुलांचे समुपदेशन करावे, तसेच या मौलाना यांनी आणखी किती मुलांवर अत्याचार केला आहे. हे शोधण्यासाठी मदारशात असलेल्या इतर ३० मुलांचे समुपदेशन करावे.
- पोलीस आयुक्तांनी धर्मादाय आयुक्त यांना विनंती करून ज्या काही संस्था अनाथ मुलांना सांभाळतात, त्या कोणत्याही जाती धर्माची मुले असली, तरी त्यांच्याकडे असलेल्या मुलांची संख्या धर्मादाय आयुक्तांच्या वेबसाईटवर समाविष्ट करून जाहीर करावे, अशा सूचना आमदार डॉ. गो-हे यांनी केल्या आहेत.
- https://www.youtube.com/watch?v=nsTfi94O87M&t=1s