ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सोने आणि चांदीच्या दरात लवकरच वाढ

आजचा एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये, तर सोन्यात 500 रुपयांची वाढ

मुंबई : सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली. तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. ऑगस्टच्या अखेरच्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला होता. आता सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

सोन्यात 500 रुपयांची वाढ

या आठवड्यात सोन्यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली. आठवड्याच्या सुरुवातीला सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. 13 सप्टेंबर रोजी त्यात 130 रुपयांची भर पडली. काल किंमतीत बदल दिसला नाही. सोने लवकरच विक्रमाला गवसणी घालू शकते. सोन्याने यावर्षात 77,000 रुपयांचा रेकॉर्ड केला आहे. तर चांदीने 87 हजारांचा टप्पा ओलांडला होता. या सणासुदीत हा विक्रम तुटण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. आता 22 कॅरेट सोने 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी या आठवड्यात 5 हजारांनी महागली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी, 10 सप्टेंबर रोजी 1 हजारांनी तर 11 सप्टेंबरला 500 रुपयांनी चांदी वधारली. 13 सप्टेंबर रोजी या धातूने 3,000 रुपयांची उसळी घेतली. तर 15 सप्टेंबर रोजी किंमती पुन्हा 2,500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळच्या सत्रात एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button