अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठेका रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/pcmc_2017082655-16.jpg)
स्थायी समितीने केला ठराव ; महिलांच्या व्यवसाय प्रशिक्षणासाठी तज्ञाची नेमणूक करणार
पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातफेर्क महिलांच्या काैशल्य ज्ञान विकास उपक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी ‘अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नेमूण करण्यात आली. परंतु, संस्थेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याने त्या संस्थेचा ठेका रद्द करण्याचा निर्णय आज (बुधवारी) स्थायी समितीने घेतला आह, अशी माहिती स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी दिली. दरम्यान, महापालिकेने संस्थेवरील उधळपट्टीस पायबंद घालून प्रशिक्षणाचे काम रद्द करावे, अशा सुचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
यावर विलास मडेगिरी म्हणाले की, महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून शहरातील महिलांचे सक्षमीकरण व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता दरवर्षी विविध 20 व्यवसायांचे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रशिक्षण दिले जात होते. त्या संस्थेने मागील दोन आर्थिक वर्षात सुमारे 51 कोटी रुपये खर्च केला आहे. परंतू, प्रशिक्षण दिलेल्या महिला लाभार्थ्यांची यादींची मिळत नाही. तसेच त्या संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या महिला कुठे व्यवसाय करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्या संस्थेचा कारभार कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. सदरील त्या संस्थेची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे स्थायी समिती सदस्यांनी केली होती. तसेच त्या संस्थेचा ठेका रद्द करण्यात यावा, अशीही मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्यामुळे बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्या संस्थेचा ठेका रद्द करण्यात ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, यापुढे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या व्यवसाय प्रशिक्षणासाठी शहरातील महिलांचा उर्स्फुत प्रतिसाद मिळाल्यानंतर कासारवाडी येथील आयटीआय संस्थेत दोन टप्प्यात महिलांना व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण देण्याकरिता विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून महापालिका मदत घेणार आहे, अशी मडेगिरी यांनी दिली आहे.