TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विद्यापीठाचा मराठी ललित संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रमचा ६ ऑक्टो. हा प्रवेश अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिवस

पुणे : ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि थिएटर वर्कशॉप कंपनी संयुक्तपणे मराठी ललित संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करत आहोत. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा २० आठवडे ( ५ महिने) एवढ्या काळासाठीचा असेल. दर आठवड्यातील तीन दिवस बुधवार,गुरुवार आणि शुक्रवार रोजी सायं. ६ ते ८ या काळात थिएटर वर्कशॉप कपंनीच्या ‘पैस रंगमंच’ चिंचवड येथेच हे आभ्यासवर्ग आयोजित केले जातील.
निवड प्रक्रियेसाठीचा हा प्रवेश अर्ज अर्जकर्त्याने पुर्ण भरणे अनिवार्य असेल. हा प्रवेश अर्ज भरल्याखेरीज निवड प्रक्रियेसाठी तुम्ही वैध असणार नाही. निवड प्रक्रियेनंतर अंतिम प्रवेशासाठीचा वेगळा प्रवेश अर्ज भरण्याची गरज नाही. निवड प्रक्रियेनंतर जाहीर झालेल्या यादीतील निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश शुल्क भरुन प्रवेश दिला जाईल. दिलेल्या वेळेत प्रवेश शुल्क न भरल्यास वा प्रवेश निश्चित न केल्यास गुणवत्तेनुसार क्रमाने येणा-यांना संधी उपलब्ध असेल. त्यासाठीची संभाव्य प्रतिक्षा यादी निश्चित केलेली असेल याची अर्जकर्त्यांनी नोंद घ्यावी.
अभ्यासक्रमाच्या पुर्ततेनंतर प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या रचनांचा सराव आणि सादरीकरण देखील पैस रंगमंच, चिंचवड येथेच होतील. शिवाय या अभ्यासक्रमासाठी अध्यापनासाठी येणारे मार्गदर्शक / शिक्षक / व्याख्याते संगीत या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी असणार आहेत.
प्रवेश पात्रता – किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण
माध्यम- मराठी
अभ्यासक्रमाचा कालावधी – २० आठवडे (५ महिने) (१२ ऑक्टोबर २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३)
वेळ – सायं. ६ ते ८ (बुधवार,गुरुवार, शुक्रवार )
प्रवेश अर्जाची अंतिम तारीख – ६ ऑक्टोबर २०२२ (सायं. ७ वाजेपर्यंत)
निवड प्रक्रीया कालावधी- शनि. दि.८ व रवि. दि.९ऑक्टोबर२०२२ (सायं.४ते ८)
निवड झालेल्या इच्छुकांची यादी जाहीर – १० ऑक्टोबर २०२२
प्रवेश शुल्क भरण्यासाठीचा कालावधी- १० ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर २०२२
प्रत्यक्ष मराठी ललित संगीत वर्ग सुरु – १२ ऑक्टोबर २०२२
प्रात्यक्षिक सादरीकरण – २५ आणि २६ फेब्रुवारी २०२३ (स्थळ- पैस रंगमंच,चिंचवड)
निवड प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारातील तुमच्या आवाजातील गाणं सादर करणे अपरिहार्य असेल. पैस रंगमंच येथे प्रत्यक्षरित्या गाणं सादर झाल्यानंतरच निवड प्रक्रियेसाठी अर्जदारास ग्राह्य धरले जाईल.
वरील प्रवेश अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने भरुन पाठवता येईल.
ऑफलाईनसाठी वरील फॉर्म प्रिंट करुन भरुन पाठवा वा कार्यालयात जमा करा.
ऑनलाईन फॉर्मसाठी खालील लिंकवर जाऊन भरा.
https://forms.gle/gU1nR2cWpozMNqSt9
अधिक माहितीसाठी संपर्क –
प्रभाकर पवार ८६६९२२०६१२ / ९०२८२६६९६४
पैस रंगमंच, प्रिमिअर प्लाझा(२), हस्तकला वस्त्रदालनाच्या वर, तिसरा मजला, जुना मुंबई- पुणे रस्ता, चिंचवड बिग बझार शेजारी, चिंचवड , पुणे ४११०१९.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button