breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातल्या उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, २२ जणांवर कारवाई

पुणे : उत्तमनगर पोलिसांनी उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. यावेळी जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी (८ मे) सामाजिक सुरक्षा पथकाने पत्त्याच्या जुगार अड्यावर छापा टाकला. हा जुगार अड्डा प्रेस्टिज पब्लिक स्कूल जवळ, दांगट पाटील नगर, एनडीए रोड, शिवणे, पुणे येथील देवेश इंटरप्रायजेसचे मागे, बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचे तळमजल्यावरील सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटांच्या पार्किंग लॉटमध्ये सुरु होता.

या कारवाईत जुगार अड्ड्याचे मालक, बाळू सीताराम मराठे (वय ५१ वर्षे) यांच्यासह २१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील २१ अटक आरोपी आणि १ पाहिजे आरोपी अशा एकूण २२ आरोपींविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुगाराच्या क्लबसाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग लॉटमध्ये अनधिकृतपणे इलेक्ट्रीक कनेक्शन घेऊन, जुगारासाठी लाईट, पंख्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे १५ टेबल आणि ७५ खुर्च्या लाऊन या क्लबमध्ये अहोरात्र जुगार सुरू होता. या प्रकरणी अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button