breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

Pune | हंगामातील पहिली आंब्याची पेटी दाखल, दर किती?

पुणे : आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे.यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.

पिकलेला आंबा एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली. या पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत ४४० रुपये आहे. पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे.

हेही वाचा – Pune-Mumbai Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज जम्बो ब्लॉक

आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत.पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button