breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली येथे ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ कथा श्रवणाची पर्वणी

श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पणनिमित्त धार्मिक उपक्रम

भाजपा आमदार महेश लांडगे यांची विधायक संकल्पना

पिंपरी : जगभरातील हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त चिखली-जाधववाडी येथे सुप्रसिद्ध कथाकार प्रेरणा बृजवाशी यांचे ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ कथा वाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. भाजपाचे प्रखर हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने विविध अध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

हेही वाचा – Pune | हंगामातील पहिली आंब्याची पेटी दाखल, दर किती?

वृंदावन, उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध कथाकार प्रेरणा किशोरी बृजवाशी यांच्या सुमधूर वाणीतून ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’चे वाचन होणार आहे. त्यासाठी चिखली-जाधववाडी येथे शुक्रवार दि. १९ जानेवारी ते गुरूवार, दि. २५ जानेवारी २०२४ असे सहा दिवस कथा वाचन होणार आहे.

प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने चिखली-जाधववाडी येथील रामायण मैदानावर प्रसिद्ध कथाकार प्रेरणा किशोरी बृजवाशी यांचा ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या अध्यात्मिक सोहळ्याचे श्रवण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करीत आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button