breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या

पुणे : पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुलावर केईएममध्येच उपचार सुरु असताना आईने टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन 36 वर्षीय महिलेने आपलं आयुष्य संपवलं आहे. संबंधित महिला पुण्यातील वानवडी भागात राहत होती. सोमवारी सकाळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्या 13 वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयातच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये दहा जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button