TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा “विशेष ब्लॉक”

पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार

पुणे : आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी १२ ते २ असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तसेच हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त कार साठी जुना पुणे – मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर दरडी हटविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. अनेकदा हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र तब्बल महिना ते दीड महिन्यांच्या कालावधीनंतर आज (मंगळवारी) पुन्हा १२ ते २ असा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यात पुण्याकडे येणारी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई – पुणे ला जोडणारा द्रुतगती मार्ग हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये – जा करत असतात. या मार्गावरून मुंबईला कमी वेळेत जात येत असल्याने सर्वजण. या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्व आहे. मात्र विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याने तीन तासांसाठी पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button