breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

G7 च्या पॉलिसी निर्मिती मध्ये पिं. चिं. ची सोनाली झोळ सहभाग घेणार

G7 शिखर परिषदेची Y7 प्रतिनिधी म्हणून पिंपरी चिंचवडच्या सोनाली झोळला निमंत्रण

G7 : इटली येथे होत असलेल्या G7 शिखर परिषदेच्या Y7 परिषदेची प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या सोनाली झोळला इमेल आलेला आहे. याची मिटिंग 21 जून ला युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना येथे होणार आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली आहे. Y7 प्रतिनिधी G7 प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय तरुण Y7 मध्ये सहभागी होतात, G7 अजेंडावर प्रभाव टाकून शिफारसी तयार करण्यासाठी सहयोग करतात. पिंपरी चिंचवडच्या सोनालीचे Y7 चे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानास्पद आहे. गतवर्षीच्या COP28 व G20 चेही सोनाली झोळ ने प्रतिनिधित्व केले होते. यासाठी तीला पिंपरी चिंचवड मधील ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Youth 7 (Y7) हा G7 चा अधिकृत युवा सहभाग गट आहे. आणि हे असे व्यासपीठ आहे जे तरुणांना त्यांच्या कल्पना आणि धोरण प्रस्ताव G7 देशांच्या राष्ट्राध्यक्ष आणि सरकारांशी शेअर करू देते. ते विविध दृष्टीकोनांचे प्रतिनिधित्व करतात, जागतिक आव्हानांवरील धोरण प्रस्तावांमध्ये योगदान देतात. प्रतिनिधी नाविन्यपूर्ण, तरुण-चालित उपायांसह G7 अजेंडावर प्रभाव टाकून शिफारसी तयार करण्यासाठी सहयोग करतात. Y7 हे जगभरातील शेकडो तरुणांना एकाच ध्येयाने गुंतवते: अधिक शाश्वत आणि सर्वसमावेशक जग निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलणे.

G-7 म्हणजेच ‘Group of Seven’ हा जगातील सात ‘प्रगत’ अर्थव्यवस्थांचा समूह आहे. हे सात देश आहेत – कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका. युरोपियन युनियन देखील G-7 चा भाग नाही परंतु त्याचे अधिकारी G-7 च्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहतात. वर्षभरात, G-7 देशांचे मंत्री आणि अधिकारी भेटतात, करार विकसित करतात आणि जागतिक घडामोडींवर संयुक्त निवेदने जारी करतात.

हेही वाचा – आजपासून ५४ औषधांच्या किमतीत घट; सरकारचा मोठा निर्णय

वडिलांच्या नोकरीमुळे सोनालीचे बालपण व शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करत तीने आकुर्डी पुणे येथील डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक अभियांत्रिकी (M.E) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तीने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तिथेच तीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO), युनायटेड नेशन्स सोबत कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच सभोवताली दिसणारी परिस्थिती, माध्यमांमधून येणाऱ्या प्रदूषण, हवामान बदलांच्या बातम्या सातत्याने कानावर पडल्यामुळेच, सोनाली पर्यावरण व तसेच जागतिक समस्या बद्दल संवेदनशील झाली.

तीने इस्रो संस्थेमधून सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण केलेला आहे. UNICEF मधील अन्न आणि कृषी संस्थेसाठी तीने कार्य केले आहे. जी20 परिषदेसाठी भारताची प्र्तिनिधी म्हणून तिची निवड झाली होती. युनायटेड नेशनच्या विविध परिषदा आणि शिखर परिषदेसाठी तीची निवड झालेली आहे. युनायटेड नेशन्सच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स साठी निवडली गेली आणि युनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज ची एक युवा मतदारसंघाची सदस्य झाली. युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचा सदस्यही झाली आणि या परिषदेसाठी निवड झाली आहे.

यावेळी G7 च्या अजेंड्यावर वाढत्या महागाई आणि व्यापार-संबंधित चिंतेमध्ये जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये समन्वय साधणे हे उद्दिष्ट आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत ऊर्जेला चालना देण्याची रणनीती असेल आणि हवामान बदलाचा सामना करण्यावर भर असेल. जागतिक आरोग्य प्रणाली सुधारण्याचा असेल कारण कोविड -19 नंतर हे स्पष्ट झाले की अशा आरोग्य आणीबाणीसाठी प्रणाली सुधारावी लागेल, असे मत सोनाली झोळ हिने व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button