breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

जिल्हा परिषदांसाठी शिवसेनेशी आघाडीची तयारी

महाईन्यूज | मुंबई

नवीन वर्षांच्या प्रारंभालाच होणाऱ्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेत दिले आहे.राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेनेबरोबर सूर जुळविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने त्याची सुरुवात केली जाणार आहे.

मागील दीड-दोन वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्दय़ावरून नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे रखडले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या निवडणुका घ्याव्यात, असे आधीच्या सरकारचे मत होते. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. भाजप-शिवेसनेची युती संपुष्टात आली आहे. राज्यस्तरावरील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता स्थानिक स्तरावरील निवडणुकांमध्येही त्यानुसारच राजकीय रणनीती आखली गेली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button