breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Prostitution in a massage parlor : चिंचवडमधील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

चिंचवड-थरमॅक्स चौक येथील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

थरमॅक्स चौक येथील सूमन मॉलमध्ये सिटी सृष्टी मसाज सेंटर आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय होत असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. ३ मार्च रोजी संबंधित मसाज सेंटरमध्ये पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही मुलींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन त्याद्वारे मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम दोघांनी स्वत:कडे ठवल्याचे आढळून आले आहे. त्याकडून एकूण १७ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी शॉम्पा कौशिक घोष (वय-३४, रा. पुनम रेसिडेन्सी, पेट्रोल पंपाशेजारी, मारुजी, ता. मुळशी) आणि अभिजित शिंगोटे (रा. डांगे चौक, चिंचवड, जि.पुणे) या दोघांवर भा.द.वि. कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button