breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘कलाकारांची दुरावस्था बघवत नाही’; भरपत्रकार परिषदेत प्रिया बेर्डे रडल्या

मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही

पुणे : मराठीतील वरिष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपुर्वी डान्सर गौतमी पाटीलच्या लावणी वरून टीका केली होती. गौतमीची लावणी कला नव्हे, उथळपणा आहे, असं त्यांनी म्हटलं होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियाच्या माध्यमात ट्रॉलर्स ट्रोल केल्याने ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अनेक जणांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने देखील त्यांना ट्रोल केलेलं होतं. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेचं नाव घेऊन मला ट्रोल करणं चुकीचं असून त्यांची कारकीर्द त्यांना समजून घ्यावी लागेल हे सांगत असताना प्रिया बेर्डे यांच्या डोळ्यातून अश्रु आले.

प्रिया बेर्डे म्हणाल्या की, गेली ४० वर्षे मी सिनेसृष्टीत काम करत आहे. वयाच्या १२ व्या वर्षी मी काम सुरू केलं. मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. इंडस्ट्रीमध्ये कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. राज्यात नाट्यगृहांची दुरावस्था आहे. कलाकारांची दुरावस्था बघवत नाही.

यावेळी बोलताना त्यांनी सर्वच कलाकारांचे प्रश्न तातडीने कसे सोडवता येतील यासाठी त्यांच्या माध्यमातून काम सध्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोरोनामध्ये कलाकारांनी कशा पद्धतीने हाल अपेक्षा सहन करत जीवन जगलं हे सगळं जवळून अनुभवताना त्यांना काय अनुभव आले हे देखील सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button