breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आज पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा, तर ममतांची पदयात्रा

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसने एकमेकांविरोधात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज भाजपाकडून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे आज पश्चिम बंगालमध्ये शाब्दिक युद्ध बघायला मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज प्रथमच पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी १.२० वाजता ते कोलकातात दाखल होतील. त्यानंतर २ वाजता पंतप्रधानांची शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर प्रचारसभा होणार आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली सिलगुडी येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरवाढीविरोधात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत हजारो लोक सहभागी होणार असल्याचे ममतांनी म्हटले आहे. दुपारी १ वाजता दार्जिलिंग येथे मोठ्या संख्येने महिला पदयात्रेसाठी येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या सभांकडे पश्चिम बंगालच्या जनतेचे लक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button