breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“थेट गोळी घालण्याऐवजी माझा घातपात होऊ शकतो”; सुषमा अंधारे

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करताना दिसतात. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्या महाराष्ट्रात कमी कालावधित शिवसेनेच्या रोखठोक भाषण आणि विधानं करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या खोचक वक्तव्य आणि टेलेबाजीयुक्त भाषणांमुळे त्या कमी कालावधित चर्चेत आल्या आहेत. असे असतानाच त्यांनी माझा घातपात होऊ शकतो, असे विधान त्यांनी केले आहे. त्या चंद्रपूरमध्ये एका सभेला संबोधित करत होत्या.

माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो, असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे.

आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

सोबतच, काही दिवसांपुर्वी सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही किर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या विधानामुळे राज्यातील वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात होतं. यानंतर त्यांनी भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button