breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आजपासून तीन राज्यांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १९ जानेवारीपासून तीन राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी सुमारे १०:४५ वाजता सोलापूर, महाराष्ट्र येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर ते दुपारी २:४५ वाजता कर्नाटकातील बेंगळुरू येथे बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौर्‍यावर जातील जेथे संध्याकाळी ६ वाजता ते चेन्नई येथे खेलो इंडिया युथ गेम्स २०२३ च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.

पुढील दोन दिवस (२० आणि २१ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या मंदिरांना भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात एका कार्यक्रमात सहभागी होतील. या मंदिरात ते विविध विद्वानांकडून कंबा रामायणममधील श्लोकांचे पठण देखील ऐकतील. त्यानंतर दुपारी २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरमला जातील. येथे श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा होईल. या मंदिरातील ‘श्री रामायण पारायण’ कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, आठ भिन्न पारंपारिक मंडळे संस्कृत, अवधी, काश्मिरी, गुरुमुखी, आसामी, बंगाली, मैथिली आणि गुजराती भाषेत रामकथा (श्री रामाच्या अयोध्येला परत येण्याचा प्रसंग सांगणारे) पठण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथील श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात पंतप्रधान भजन संध्यालाही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

२१ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी धनुषकोडी येथील कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा करतील. हे मंदिर श्री कोठंडाराम स्वामींना समर्पित आहे. कोठंडाराम नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम. हे धनुषकोडी नावाच्या ठिकाणी वसलेले आहे. येथेच विभीषणाने श्रीरामांना पहिल्यांदा भेटून त्यांच्याकडे आश्रय घेतला होता, असे सांगितले जाते. श्रीरामांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला ते हे ठिकाण आहे असेही म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी धनुषकोडीजवळील अरिचल मुनईलाही भेट देतील, जिथे राम सेतू बांधला गेला होता असे म्हटले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button