breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“इडीच्या भीतीमुळे ७००० व्यावसायिक देश सोडून गेले”; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

आगामी विधानसभेत सेना आणि वंचित एकञित लढल्या तरी 150 जागा येतील

पुणे : इंटरनॅशनल मायग्रेशन मॉनिटर करणारे एक कमिशन साऊथ आफ्रिका येथे आहे. त्यांनी त्यावेळेस एक आकडेवारी दिली होती की 2014 ते 2016 साल पर्यंत किमान 2 लाख 23 हजार च्या वर भारतीय ज्यांची मालमत्ता 500 कोटींच्या वर आहे ते मायग्रेट झालेली आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मागच्या राज्यसभेत सरकारने स्वतः एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटल आहे की, 7 लाख 65 हजार भारतीय ज्याची मालमत्ता 500 कोटींच्या वर आहे. त्यांनी कायमस्वरूपी मायग्रेट केलेलं आहे. यातील काही माझ्या ओळखीचे असून त्यांनी मायग्रेशन हे भीती पोटी केलेलं असल्याचं सांगितल आहे.

देशात 1950 ते 2014 सालापर्यंत देशात 7000 मायग्रेट झाले आहे. 2014 साली जेव्हा भाजप आरएसएसची सरकार आली आहे. तेव्हापासून भारतातून तब्बल 7 लाख 65 हजार व्यवसायिकांनी मायग्रेट केलं आहे. हे सरकार सातत्याने म्हणत आहे की हे सरकार हिंदूंचं सरकार आहे. आपण पहिलं तर जेवढ्या लोकांनी मायग्रेट केलं आहे त्यात सर्वाधिक व्यवसायिक हे हिंदू आहे. यात 100 पेक्षा कमी व्यवसायिक हे मुस्लिम आहे. आमच्या वर हे रेड करतील चौकशी करतील नाव खराब करतील या भीतीने या व्यवसायिकांनी मायग्रेट केल्याचं, यावेळी आंबेडकर म्हणाले.

राज्यातील विषयांवर आंबेडकर म्हणाले की, आगामी विधानसभेत सेना आणि वंचित एकञित लढल्या तरी 150 जागा येतील. आम्ही जर महविकास आघाडी सरकार बरोबर मिळून लढलो तर 200 च्या पुढे जागा आरामात जिंकू. म्हणूनच आता दोन्ही काँग्रेसने ठरवायचं आपण चौघांनी एकञ यायचं की भांडत बसायचे ते मी शरद पवारांसोबतचे मतभेद केव्हाच सोडून दिलेत. त्यामुळे मविआ सोबत जाताना माझ्या बाजुने तरी कोणताही किंतु परंतु नाही तसंच जेव्हा आम्ही सेनासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच असं ठरवलंय की एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची. त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही हे तारतम्य पाळावं, असा सल्लाही यावेळी आंबेडकरांनी संजय राऊत सारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना दिलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button