breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर | “अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला. तर स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असंही संग्राम जगताप यांनी सांगतिलं.

महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहायला मिळेल याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे. नगरमध्ये सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. भाजपचा सभापतीपदाचा उमेदवारच राष्ट्रवादीत दाखल झाल्याने नगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button