Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

जिल्हा परिषद निवडणूक : पुण्यात भारतीय जनता पार्टी ‘‘स्वबळावर’’

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीशी युती नाही : बाळा भेगडे यांच्या बैठकीत सूर

पुणे : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळाचा निर्धार व्यक्त करत, मावळ तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही युती केली जाणार नसल्याची ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मांडली.
भाजपने या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही बाळा भेगडे यांनी दिली. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाला पंचायत समितीच्या टाकवे गणात, तर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला खडकाळे गणात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मावळ तालुक्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीस मावळ तालुक्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

पंचायत समिती गणनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत :

इंदोरी–वराळे  : मेघाताई प्रशांत भागवत
इंदोरी गणातून : श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे,
वराळे गणातून : रवींद्र निवृत्ती शेटे,
चांदखेड गणातून : सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले,
उर्से गणातून : बाळासाहेब नथू पारखी,
काले गणातून : सीमाताई मुकुंदराव ठाकर,
कार्ला गणातून :  रंजनाताई सुरेश गायकवाड,
टाकवे गणातून :  अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) शिवसेना शिंदे गटाच्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उरलेल्या उमेदवारांची घोषणा उद्या संध्याकाळी करण्यात येणार असल्याची माहिती देताना, परवा मंगळवारी वडगाव मावळ येथे भव्य मिरवणूक काढून महायुतीचे सर्व १५ उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button