Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
वाढत्या बेरोजगारीविरोधात युवकांनी आवाज उठवला पाहिजे: आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे: महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकारमुळे उद्योग बाहेर गेले!
![Youth should raise voice against rising unemployment: Aditya Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Aditya-thackeray-780x470.jpg)
मुंबई: एका जागतिक संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातल्या बेरोजगारीचा टक्का ८.११% वर गेला आहे. शहरी भागात तर तो ९.८१% इतका वाढला आहे. ह्या सगळ्यात महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकार मात्र महाराष्ट्रातले उद्योग बाहेर धाडण्यात पटाईत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन, एयरबस – टाटा प्रकल्प ह्यासारखे महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार मिळवून देणारे मेगा प्रकल्प शेजारच्या राज्यात घालवले गेले. त्यामुळेच महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती जास्त चिंताजनक झाली आहे. ह्यावर युवकांनी संघटीत होऊन आवाज उठवायला हवा, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.