राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर का उभं केलं? चौकशीची मागणी
![Why President Draupadi Murmu was erected outside the Jagannath temple](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/draupadi-murmu-780x470.jpg)
Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी २० जून रोजी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली. यावेळी अश्विन वैष्णव तसंच धर्मेंद्र प्रधान यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन देण्यात आलं आहे. तर राष्ट्रपती मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर का उभं करण्यात आलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पत्रकार दिलीप मंडल यांनी याविषयी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. मग भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅरियरच्या बाहेर का उभं केलं गेलं आहे? त्यांना गाभाऱ्यात प्रवेश का दिला गेलेला नाही?
हेही वाचा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड
धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातील मूर्तींना गाभाऱ्यात जाऊन स्पर्श केला आणि दर्शन घेतलं. त्याच मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मात्र बाहेरुन पूजा केली. ही बाब चिंताजनक आहे, या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे तसंच पुजाऱ्यांना अटक केली गेली पाहिजे अशीही मागणी दिलीप मंडल यांनी केली आहे.