Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, कुठे व किती वाजता होणार?

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

शपथविधी सोहळा कुठे होणार?

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा     –      एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार; रामदास आठवलेंचं सूचक विधान

शपथविधी सोहळा किती वाजता होणार?

महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील. तसेच यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे देखील शपथ घेणार आहेत.

शपथविधीसाठी कोण उपस्थित राहणार?

या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button