Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? जाणून घ्या निवडणुकीची A टू Z माहिती

मुंबई | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे.
या निवडणुकीची अशी असणार कार्यप्रणाली :
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज : शुक्रवार, ७ जून २०२४
या तारखेपर्यंत करता येणार अर्जांची छाननी : सोमवार, १० जून २०२४
हेही वाचा – पंतप्रधान मोदीवर टीका करणारा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याने वकिलाविरोधात गुन्हा दाखल
या तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार : बुधवार, १२ जून २०२४
या तारखेला होणार मतदान : बुधवार २६ जून २०२४
या वेळेत मतदान पार पडणार : सकाळी ८ ते दुपारी ४
या तारखेला होणार मतमोजणी : सोमवार १ जूलै २०२४




