‘पुणे की पसंत मोरे वसंत!’; वसंत मोरेंचं आजचं स्टेटस चर्चेत

पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. मनसेकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, वसंत मोरे यांच्या व्हॉट्स एप स्टेटसची चांगलीच चर्चा आहे.
वसंत मोरे यांनी आज पुन्हा एक व्हॉट्स एप स्टेटस ठेवलं आहे. ‘आता सगळेच म्हणू लागलेत, पुणे की पसंत मोरे वसंत !’ असं स्टेटस त्यांनी ठेवलय. या स्टेटसमधून त्यांनी मनसेकडून तिकीट मिळण्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा – ‘नेहरूंचं आजही स्मरण, मात्र मोदींचं स्मरण राहणार नाही’; संजय राऊतांची टीका

दोन दिवसांपुर्वीही वसंत मोरेंनी असंच स्टेटस ठेवलं होतं. यामध्ये, कुणासाठी कितीबी करा राव, पण वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार, असं लिहिलं होतं. मुळे वसंत मोरे यांचा रोख नेमका कोणावर आहे? त्यांनी कोणाला इशारा दिला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.





