अमित शाहांनी जाहीर केला पुढच्या ३५ वर्षांचा प्लॅन; पक्षाला धक्काही लागणार नाही अशी रणनीती

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या भाजपने नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. १ सप्टेंबरपासून पक्ष राष्ट्रव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरु करत आहे. पक्षाने या अभियानाच्या माध्यमातून दहा कोटी रुपये नवीन सदस्य जोडण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे.
महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांच्याकडे भाजपने सदस्य नोंदणी अभियानाचं संयोजकपद दिलेलं आहे. अभियानाचा पहिला टप्पा १ ते २५ सप्टेंबर असा असेल, दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अभियानाची सुरुवात होईल.
हेही वाचा – ‘लाडकी बहिण योजनाला आम्ही आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्कम देऊ’; आदित्य ठाकरेंची खोचक टीका
भाजपने २०१४ ते २०१९ पर्यंत राबवलेल्या या अभियानामध्ये १८ कोटी सदस्य जोडले होते. आता भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी मिस्ड कॉल, क्यूआर कोड, नमो अॅप आणि पक्षाच्या वेबसाईटच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी होणार आहे.
पक्षाच्या बैठकीत अमित शाहांनी सांगितलं की, देशाच्या राजकारणात पुढच्या ३५ वर्षांपर्यंत भाजपला धक्काही लागणार नाही. भाजप हा एक ज्वलंत, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक पक्ष आहे. पक्षाची मुळं खोलवर रुजलेली आहेत. ”काही राज्यांमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही.. दुसरी बाजू बघितल्यास आपण ओडिशामध्ये सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालेलो आहोत. इशान्य भागात आपली शक्ती वाढली आहे.” असंही अमित शाह म्हणाले.





