Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये रविवारी विविध कार्यक्रम

सातारा : रविवार दि. २६ ऑक्टोबर२०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फलटण शहर आणि तालुक्यातील शेकडो कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण , उदघाटन आणि भूमीपुजन व फलटण नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका च्या पार्श्वभूमीवर भव्य सभेचे आयोजन आले असल्याची माहिती माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

नीरा- देवघर प्रकल्पातून उतरवलेली खंडाळा धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पांतर्गत बंद पाईपलाईनद्वारे योजनेचे उद्घाटन व लोकार्पण आणि त्यापुढील टप्प्याचे भूमिपूजन, नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून हजारोंच्या भविष्याचे दालन खुले करणार असून यावेळी विविध कंपन्यांचे प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पाहणी व आढावा बैठक होणार आहे.

हेही वाचा –  काँग्रेस BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा

याशिवाय दहिवडी – फलटण रस्त्याचे भूमिपूजन , फलटण नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची उद्घाटने, फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन , १०० कोटीची महसूल अंतर्गत प्रशासकीय इमारत व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन, बारामती प्रमाणे फलटणमधून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्याचे सुशोभिकरण प्रकल्प , फलटणमधील ८५ कोटीच्या काँक्रीट रिंग रोङचे उदघाटन, सेशन कोर्ट , महसूल भवन इत्यादी अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

फलटणचा भविष्यकाळ व विकास कसा असेल, हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर, ते मुख्यमंत्री महोदयांच्या या कार्यक्रमातून समजणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button