वाल्मिक कराड पोलिसांना शरण, पुणे सीआयडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी दाखल

Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. विरोधकांनी देखील वाल्मिक कराडला अटक व्हावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच आज त्यासाठी सीआयडीची पथकं सज्ज झाली होती. मात्र वाल्मिक कराडनेच आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये येत स्वत: ला सरेंडर केले आहे.
हेही वाचा – विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी
मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असं वाल्मिक कराड यांनी म्हटलं आहे.





