‘तिकडे शेपूट घालतात अन् महाराष्ट्रात फणा काढतात’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल
![Uddhav Thackeray said that they are putting their tails there and they are pulling out their tails in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Uddhav-Thackeray-780x470.jpg)
Uddhav Thackeray | धाराशिव येथे घेतलेल्या कुटुंब संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह काल परवा महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना फोडली म्हणजे शिवसेना संपेल, असं भाजपला वाटलं होतं. महायुतीच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाके लागली आहेत. आमच्या सभेला मैदान पूर्ण भरलेले असते. शिवसेना भाजपला गाडून पुढे जाणार. मोदी हा खोटा शिक्का आहे. मोंदींना कुणी ओळखत नव्हतं, तेव्हाही आपण धाराशिव जिंकत होतो. काल परवा देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढत आहेत.
हेही वाचा – शरद पवरांच्या आरोपांनंतर सुनील शेळकेंचा खुलासा; म्हणाले..
जम्मू-काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही, तिथे शेपूट घालतात. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी सुरू आहे, तिथेही शेपूट घालतात आणि असे शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढून गेले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, असे ते म्हणाले. आमची रिक्षा पंक्चर झाली असेल कारण ती साध्या माणसाची रिक्षा आहे. पण तुमचे ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.