श्रीराम मंदिर, योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल

Ayodhya Ram Mandir : आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश एटीएसचे प्रमुख अमिताभ यश यांनाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गो परिषदेशी संबंधित देवेंद्र तिवारी यांना २७ डिसेंबर रोजी दुपारी २.०७ वाजता एक ई-मेल आला आहे. त्यामध्ये, आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आला असून आरोपीने अयोध्येतील श्रीराम मंदिर, युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि एटीएस प्रमुख अमिताभ यश यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचे नाव जुबेर हुसैन (खान) असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – २०२३ मध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिल्या मोदी सरकारच्या ‘या’ घोषणा!
आज दिनांक 27 दिसंबर 2023 को दोपहर 2:07 पर उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी, एसटीएफ के चीफ श्री अमिताभ यश जी एवं मुझे फिर से zuber khan नाम के व्यक्ति द्वारा जान से मारने का ईमेल प्राप्त हुआ है। जिसको लेकर मैं इस खबर के साथ प्राप्त हुई मेल की फोटोकॉपी संलग्न… pic.twitter.com/P1hYb9BtJV
— Devendra Tiwari (@iDevendraBKM) December 27, 2023
संबंधित व्यक्ती आयएसआय या दहशतवादी संघटनेशी निगडीत असून तीन लोकांमुळे तो त्रस्त असल्याचे त्याने म्हटले आहे. याप्रकरणी, देवेंद्र तिवारी यांनी ट्विटरवरुन मेसेज लिहिला आहे. मला जुबेर खान नामक व्यक्तीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये, अयोध्येतील श्रीराम मंदिर, युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि एटीएस प्रमुख अमिताभ यश व मला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या मेलच्या पत्राची कॉपी मी शेअर करत सुरक्षेची आणि तपासाची मागणी करत असल्याचं देवेंद्र यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.





