Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला.  निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा  देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर झाला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे.

देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. आयातीवरील निर्भरता कमी करणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. लोकांची क्रयशक्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीतारमण यांनी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेची घोषणा केली आहे यामाध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनींग आणि उद्योग देण्यात येणार आहेत असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

हेही वाचा – Budget 2026 : पुणे, मुंबईबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा…

अर्थसंकल्पातील महत्वाची घोषणा कोणत्या?

  • केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करणार.
  • भारताला औषध निर्मितीचे हब बनवू, बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
  • पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देणार
  • इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स – सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद
  • सरकार दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर तयार करणार
  • जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल
  • सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार
  • आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधले जातील
  • जलमार्गाचे जाळे वाढवणार 2047 पर्यतं 12 टक्क्यांनी वाढवणार
  • सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार
  • भारताला औषध निर्मितीचे हब बनवणार आहे
  • बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
  • शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
  • 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर
  • मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
  • 20 नवे जलमार्ग बनवणार
  • बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा ?

1) नारळ संशोधन केंद्र स्थापन करणार- 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ

2) पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार

3) काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार

4) शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

5) 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार

6) कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार

7) चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार

8) ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर

9) आयातीवर अवलंबत्व कमी करणार

10) मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार

11) सागरी किनारपट्टी आणि इशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणार

12) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे पर्याय तपासणार

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button