Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2026 : पुणे, मुंबईबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा…

Union Budget 2026 : संसदेत आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे. आज दिवसभराच्या अपडेट पाहा इथे…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील

अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

  • सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी
  • भारताला औषध निर्मितीचे हब बनवू,
  • बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
  • शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
  • 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर
  • मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
  • 20 नवे जलमार्ग बनवणार
  • बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती

हेही वाचा – पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

पुणे, मुंबईबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा…

पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. मुंबई ते पुणे, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते वाराणसी यासह सात हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत.

आत्मनिर्भर भारतासाठी सरकारने तिजोरी उघडली

सरकारने आत्मनिर्भर भारतासाठी तिजोरी उघडली असून अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी यासाठी २००० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आल्या आहेत. यात टियर २ आणि टियर ३ शहरे विकसित केली जातील. ५,००,००० किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे विकसित केली जातील.

ओडिसा आणि केरळबद्दल निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा..

खनिज कॉरिडोअर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळला होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे होणार स्वस्त…

कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले…

भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले असून भविष्यात याबाबत निर्णय घेतली जातील.

गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू

गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत, असे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आर्थिक विकासदरात वाढ हे आमचे पहिले मोठे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.

उत्पादन वाढवण्यावर आमचा भर…

देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर असल्याचे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केले आहे.

आत्मनिर्भर भारत हे सरकारचे प्रमुख लक्ष्य- निर्मला सीतारामण

अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. या अर्थसंकल्पाकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button