breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता शिवसेनेची साथ सोडणार

मुंबई : गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यावेळी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू असलेले आमदार एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत बंड पुकारला. या बंडात आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पाडून गुवाहाटी गाठलं. मात्र त्यावेळी राज्यात शिवसैनिकांनी चांगलच रान पेटवलं होत. त्या बंडानंतर राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, पोस्टरला काळ फासणे, दुकानांची तोडफोड अशा विविध घटना घडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक होत शिंदे गटाच्या बंडावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठक घेतल्या. मात्र त्या बैठकांचा उद्धव ठाकरे यांना काहीही फायदा झाला नाही.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना माघार घेत राजीनामा द्यावा लागला. त्या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजप पक्षासोबत युती करत सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. या घटना घडल्यानंतर राजकारण काही प्रमाणात स्थिर होताच पुन्हा एकदा राज्यात दुसरा भूकंप झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्याच पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी भाजप- शिंदे गटासोबत जाऊन धक्का दिला. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नऊ आमदार सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

यापार्शवभूमीवर पुन्हा उद्या राज्यात मोठा बदलावं पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीला अगदी काही दिवस बाकी असताना शिंदे गटाला एक जोरदार धक्का बसण्याची चित्र दिसत आहेत. गेल्या काहीदिवसांपासून शिंदे गटामध्ये अनेक मोठे राजकीय नेते प्रवेश करत असल्याने संख्या वाढत चालली आहे. मात्र या सगळ्याला फाटा देत शिंदे गटाला धक्का बसणार आहे.

हेही वाचा – हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

आता शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकनाथ शिंदे यांना रामराम ठोकणार आहेत. पांडुरंग बरोरा हे उद्या गुरुवारी १९  ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे. महत्वाचं म्हणजे पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्यानंतर शहापुर येथे मोठी जाहीर सभा घेणार आहेत.

पांडुरंग बरोरा नेमके कोण आहेत?

माजी आमदार पांडुरंग बरोरा हे १९८० सालापासून राष्ट्रवादी पक्षासोबत कार्यरत होते. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आणि त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पांडुरंग बरोरा यांनी २०१९ मध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुन्हा ताकद वाढणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नव्याने पालवी फुटण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले पांडुरंग बरोरा?

पांडुरंग बरोरा यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सर्व शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी आणि आदरणीय शरद पवार साहेब वसर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडून शिवसेना या पक्षात गेलो खरा पण मात्र माझंही हा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे माझी खऱ्या अर्थाने ती एक मोठी चूकच झाली आहे. त्यामुळे माझ्या या निर्णयामुळे मी सर्वात पहिल्यांदा सर्व जनतेची व पदाधिकाऱ्यांची खऱ्या अर्थाने माफी मागत आहे, असे बोलून माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी माफी मागितली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button