अधिवेशनाचा शेवटचा दिवस; विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा तयारीत
![The last day of the session prepares to surround the opposition rulers on various issues](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Maharashtra-Assembly-session-780x470.jpg)
मुंबई : आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना महागाईच्या मुद्द्यावरून देखील घेरू शकतात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषण होतील. त्याचबरोबर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील आज भाषण करतील. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या चहापानाने आज पावसाळी अधिवेशनाचा शेवट होईल.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न, पावसामुळं झालेलं नुकसान, संभाजी भिडे यांचा मुद्दा, समृद्धी मार्गावर झालेले अपघात, महिलांचे प्रश्न, धार्मिक हिंसाचार इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. या मुद्द्यांवरून सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
हेही वाचा – ‘राजू शेट्टी मांजराची जात, त्यांनी लोकांचा घात केलाय’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
दरम्यान, १ जुलै रोजी काँग्रेसनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस राहुल नार्वेकर यांच्याकडं केली होती. त्यानंतर काल विधानसभा अध्यक्षांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पद नियुक्तीला मान्यता दिली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडं विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.