breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

समृद्धी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, १२ ठार तर २२ जण जखमी

पुणे : समृद्दी महामार्गाचा पहिला टप्पा (शिर्डी-नागपूर) राज्यातील जनतेसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र, या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले आहेत. तर २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते.

बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. हे प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या २३ प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा – रोहित सेनेकडून पाकला मिळाला बेदम चोप; वर्ल्ड कपमध्ये मिळवला सलग आठवा विजय

जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की पोलिसांनी एका ट्रकला थांबवलं होतं. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. पोलिसांनी अद्याप या अपघाताबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button