IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला १९१ धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात १९२ धावांचे लक्ष्य भारताने ३०.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८६ धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद ५३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.
या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचली आहे.
हेही वाचा – ‘कृषिप्रधान’ भारतात बैल शेतकऱ्यांचा हक्काचा सवंगडी!
https://twitter.com/toisports/status/1713410274726904131
वर्ल्डकपमधील भारताचे पाकिस्तानवरील विजय
- १९९२- भारताचा ४३ धावांनी विजय
- १९९६- भारताचा ३९ धावांनी विजय
- १९९९- भारताचा ४७ धावांनी विजय
- २००३- भारताचा ६ विकेटनी विजय
- २०११- भारताचा २९ धावांनी विजय
- २०१५- भारताचा ७६ धांनी विजय
- २०१९- भारताचा ८९ धावांनी विजय
- २०२३- भारताचा ७ विकेटनी विजय




