विजय शिवतारेंच्या आरोपाला सुप्रिया सुळेचे प्रत्युत्तर; म्हणाल्या,..
![Supriya Sule's response to Vijay Sivatare's allegation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/vijay-shivtare-and-supriya-sule-780x470.jpg)
भाजपला पुणेकरांनी थम डाऊन दाखवले आहे
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आज सकाळी संवाद साधलेला आहे. सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना एका पत्र द्वारे मोदी यांच्या पर्यंत पोहचवल्या असतील. केंद्राला विनंती आहे की पार्लमेंट मध्ये महागाई ची चर्चा व्हायला पाहिजे. गॅस दरवाढ बरोबर महागाई आणि बेरोजगारी या विषयाबद्दल आम्ही बोलत आहोत. आयात व निर्यात कमी झाली आहे. सरकार पॉलिसी लेवल वर काय काम करत आहे.
विजय शिवतारे यांनी केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या वाचनात अजून काही आले नाही. संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी बघत आहे त्यामुळे शिवतारे काय म्हणाले यावर बोलण्यासारखं काही नाही.
नुकत्याच कसबा पेठ पोट निवडणूक झाली आहे यावर सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची आणि कसबा मधील जनतेचे आभार मानते अशी प्रतक्रिया दिली आहे. भाजपला पुणेकरांनी थम डाऊन दाखवले आहे. पुन्हा आता चर्चा विकासाची करू, असे देखील त्या म्हणाल्या.
सरकारचा राशन दुकान बंद करण्याचा विचार सुरू आहे. जर राशन बंद झाले तर फूड कॉर्पोरेशन काय करणार, यामुळे मिनिमम सपोर्ट रक्कम हे देखील प्रश्न उपस्थितीत होणार आहेत. असे झाले तर गरीब माणसाने कसे जगायचे. या मागे काय षडयंत्र आहे हे पाहावं लागेल. लोकसभेत आम्ही ८० कोटी लोकांना अन्न देतो असं म्हणता मग आता या लोकांचे काय करणार आहात, असा सवाल केंद्र सरकारला केला.