शरद पवार, उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ बड्या नेत्यांचं मोदींना पत्र; पत्रात नारायण राणेंचा उल्लेख

देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलं आहे
मुंबई : देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गौरवापर होत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे. राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख ९ बड्या नेत्यांनी या पत्रावर सही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहणाऱ्या पत्रात नऊ विरोधी पक्षातील नेत्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव या नेत्यांचा समावेश आहे.
पत्रात काय म्हटलं आहे?
२०१४ मध्ये भाजपाती सत्ता आल्यानंतर देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आळी. मात्र, अश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये नेते आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदी अधिकारी, मुकूल रॉय, नारायण राणे चा समावेश आहे, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.
प्रदीर्घ चौकशीनंतर २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्या खोटे आरोप करण्यात आले. कोणतेही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची अटक एक राजकीय अटक होती. राजकीय सूडबुद्दीने कारवाई केल्याचं हे उत्तम उदाहरण आहे, अशा कारवाईंमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे.




