breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

..तर दहाव्याला कावळ्याआधी मी हजर राहील, भाषणात सुजय विखेंचे यांचे मिश्किल भाष्य

Sujay Vikhe Patil | लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर सुजय विखे यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात राजकारणाबाबत वक्तव्य केले आहे.

मी ठरवलंय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण-गोंधळ, हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे हजर राहील, असं सुजय विखे म्हणाले. बदलेले राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो, मात्र लोकसभेनंतर मी खूप काही शिकलो असेही ते म्हणाले आहेत. एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा     –      पुण्याच्या भोरमध्ये ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखेंचा जवळपास २९ हजार मतांनी पराभव केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button