पुण्याच्या भोरमध्ये ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुणे | पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही ड्रोन घिरट्या घालत असल्याच समोर आलयं. रात्री साडेदहा ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालत होते. हा ड्रोन कुणाचा होता? कशासाठी हा ड्रोन उडवण्यात येत होता? ह्याचा मात्र तपास लागलेला नाही.
ड्रोन रात्रीच्या अंधारात उडवून नक्की कुठला डेटा याद्वारे कलेक्ट केला जातोय, याचा शोध पोलिसांना लागला नसल्यानं याबाबतचं गुढ अद्याप कायम आहे. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरणाऱ्या या ड्रोनद्वारे कलेक्ट केलेल्या डेटाद्वारे कुठलीही अनुचित घटना तर घडणार घडणार नाही ना? या द्वारे विविध भागांची रेकी तर केली जात नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनातयत. त्यामुळे हे ड्रोन कोण उडवतं होत? कशासाठी उडवतं होत? त्या मागचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांना पडलेत.





