breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ

Government Employees | शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित महागाई भत्याचा दर दर ठरवण्यात आला आहे. याला राज्य सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे. जानेवारीपासून ते जूनपर्यंतची थकबाकी जुलै महिन्याच्या पगारात देणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे.

गेल्या काही काळापासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. पुढील तीन महिन्यात राज्यात निवडणुका होत आहेत. त्यानुसार निवडणुकांच्या अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा    –        ..तर दहाव्याला कावळ्याआधी मी हजर राहील, भाषणात सुजय विखेंचे यांचे मिश्किल भाष्य 

२०२३ पासून कितीवेळा झाली महागाई भत्त्यात वाढ?

याआधी १ जानेवारी २०२३ रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी ४२ टक्के महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये महागाई भत्ता वाढला नाही, परंतु २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला होता. ४२ वरून ४६ टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता. त्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता. दरम्यान, जानेवारीत महागाई भत्ता वाढला नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यानुसार आता जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button