Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘माझ्या मुलीमुळे ऋषी सुनक पंतप्रधानपदी’; सुनक यांच्या सासुबाईंचं वक्तव्य

मुंबई : भारतीय वंशाचे अनेकजण परदेशात राजकीय क्षेत्रात मोठ्या-मोठ्या पदावर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील भारतीय वंशाचे आहेत. ऋषी सुनक हे इन्फोसेसचे संस्थआपक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्ती यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.
सुधा मुर्ती म्हणाल्या की, पत्नीची खूप ताकद असते. पत्नी पतीचं आयुष्य कसं बदलू शकते पाहा. पण मी माझ्या नवऱ्याला बदलू शकले नाही. मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं. माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान बनवलं.
आमच्या घरात गुरुवारी उपवास करण्याची पद्धत आहे. माझ्या मुलीमुळे माझे जावई, जे पंजाबी आहेत, त्यांनीही गुरुवारी उपवास करायला सुरुवात केली, असंही लेखिका सुधा मूर्ती म्हणाल्या आहेत.





