Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

स्वच्छ पाणी, शुद्ध हवेबाबत सरकारला धारेवर का धरत नाही? सोनम वांगचुक यांचा परखड सवाल

Sonam Wangchuk | कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय मतदार स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत? असा सवाल लडाख येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपस्थित केला. फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर पुणेतर्फे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये सोनम वांगचुक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सोनम वांगचुक म्हणाले, की लडाखमधील प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पामुळे चारावाह्यांचा उदरनिर्वाह संपुष्टात येण्याची शक्यता असून, दिल्लीतील चंगळवादासाठी वीजपुरवठा केला जाणार असेल, तर आम्हाला नक्कीच वाईट वाटेल. लडाखच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध गट लढाई लढत असून, त्यांच्या एकजुटीची गरज आहे. त्यासोबतच धर्म, न्यायव्यवस्था अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे.

हेही वाचा  :  ‘२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही’; भाजप नेत्याचं विधान 

सुरा भोसकणारा मोठा गुन्हेगार असतो. त्याप्रमाणे चंगळवादी जीवनशैलीमुळे स्वतःसह इतरांचेही आयुष्य अनैसर्गिकपणे घटविणाराही गुन्हेगार नाही का? असं सोनम वांगचुक म्हणाले. तसेच, पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विरोध दर्शवित वांगचुक यांनी नदी पुनरुज्जीवन चळवळीला पाठिंबा दर्शविला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button