Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘हिंजवडी, माण, मारूजींसह ७ गावे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेच सामील होणार’; श्रीरंग बारणे

पुणे : हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे या गावांचा लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यात येईल, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.

हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागात आयटी पार्क असून, गहुंजे याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. पण अद्यापही वाढते नागरीकरण, अपुऱ्या मूलभूत सुविधा, वाहतूककोंडी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अभाव अशा अनेक समस्या इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत.

हेही वाचा – पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ड्राग्जचा व्यापार वाढला – चंद्रकांत पाटील

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतींना पुरेशा सुविधा उभारता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या गावांच्या विकासाच्या दृष्टीने या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button